
Mumbai: कुठे पादचारी पुलाचे गर्डर कार्य सुरू?

सेंट्रल रेल्वेकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (mumbai) सेंट्रल रेल्वे(Central Railway) मुंबई विभाग कसारा स्थानकावर ६ मीटर पादचारी पुल बांधण्यासाठी तीन टप्प्यात गर्डर लॉंच करण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक चालविणार आहे.
विशेष ट्रॅफिक ब्लॉक्सचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत-
I. ब्लॉक १ : शनिवार दि. ७ मे २०२२ रोजी दुपारी २:२५ ते ३:३५ पर्यंत आसनगाव ते कसारा दरम्यान अप मार्गावर.
उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/रद्दीकरण आणि ब्लॉक कालावधित गाड्यांचे परिचालन
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११:४२ आणि १२:३० वाजता कसार्यासाठी सुटणारी लोकल आसनगाव येथे शॉर्ट टर्मिनेट होईल आणि आसनगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस धीमी लोकल आसनगावहून दुपारी १:४८ आणि दुपारी २:५० वाजता निघेल.
• कसारा येथून दुपारी २:४२ आणि दुपारी ३:३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करिता सुटणारी लोकल रद्द राहील.
• आसनगाव ते कसारा दरम्यानची उपनगरीय सेवा डाउन दिशेला सकाळी ११:५५ ते दुपारी ३:१० पर्यंत आणि अप दिशेला दुपारी १:३० ते सायंकाळी ४:१५ पर्यंत बंद राहील.
• ब्लॉक दरम्यान, कसारा येथून सुटणाऱ्या आणि संपणाऱ्या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून चालविण्यात येतील, अप मेल/एक्स्प्रेस गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून चालविण्यात येतील आणि डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून चालविण्यात येतील.

अप एक्सप्रेस गाड्यांचे नियमन
• 15018 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि 12335 भागलपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकावर नियमित केल्या जातील आणि वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.
II. ब्लॉक 2 – शनिवार/रविवार दि. ७/८ मे २०२२ रोजी मध्यरात्री ३:३५ ते पहाटे ४:५५ पर्यंत आसनगाव आणि कसारा दरम्यान अप आणि डाउन मार्गावर.
उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक
• कसारा येथून पहाटे ४:५९ वाजता सुटणारी अप लोकल पहाटे ५:१५ वाजता सुटेल.
अप एक्सप्रेस गाड्यांचे नियमन
• 12112 अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस इगतपुरी येथे ४५ मिनिटे नियमित केली जाईल, 17058 सिकंदराबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देवगिरी एक्स्प्रेस १५ मिनिटे उशिराने असेल आणि दोन्ही गाड्या दादरला शॉर्ट टर्मिनेट होतील.
• 12106 गोंदिया-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विदर्भ एक्स्प्रेस इगतपुरी येथे नियमित केली जाईल आणि तिच्या नियोजित वेळेने १ तास उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
• 12618 हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस रोहा येथे वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.
III. ब्लॉक 3 – रविवार दि. ८ मे २०२२ रोजी सकाळी १०:५० ते दुपारी १२:२० पर्यंत डाउन मार्गावर आणि दुपारी २:५० ते दुपारी ३:५० पर्यंत आसनगाव आणि कसारा दरम्यान अप आणि डाउन मार्गावर.
उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/रद्दीकरण
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९:३४ आणि दुपारी १२:३० वाजता कसार्यासाठी सुटणारी लोकल रद्द केली जाईल.
• कसारा येथून दुपारी १२:१९ आणि ३:३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करिता सुटणारी लोकल कसारा ते ठाणे दरम्यान रद्द राहील.
अप एक्सप्रेस गाड्यांचे नियमन
• 15018 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि 12742 पाटणा- वास्को एक्स्प्रेस इगतपुरी स्टेशनवर नियमित केल्या जातील आणि वेळापत्रकापेक्षा ३५ ते ४० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
डाउन एक्सप्रेस गाड्यांचे नियमन
• 12617 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस खर्डी स्टेशनवर ३० ते ३५ मिनिटे नियमित केली जाईल.
• 12188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जबलपूर गरीब रथ एक्स्प्रेस २५ ते ३० मिनिटे आटगाव स्थानकावर नियमित केली जाईल.
• 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी कामायनी एक्सप्रेस खडवली स्थानकावर(Khadavali station) १५ ते २० मिनिटे नियमित केली जाईल.
या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.