
Mumbai : ‘हे’ कारस्थान लाज, लज्जा आणि शरम सोडून सुरु आहे : उद्धव ठाकरे

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : संजय राऊतांवरील कारवाईवर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी हे कारस्थान लज्जा आणि शरम सोडून सुरु आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करीत होते. सक्तवसुली संचालनालयाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ या निवासस्थानावर आज(३१ जुलै) रोजी छापा टाकला. संजय राऊतांवरील या कारवाईनंतर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की लाज, लज्जा, शरम सोडून निर्लज्जपणाने हे कारस्थान सुरु आहे. हिंदुत्वबद्दल बोलायचे जेव्हा कोणाचे धाडस होत नव्हते. तेव्हा शिवसेना हा एकमेव पक्ष हिंदुत्वावर बोलत होता. अमरनाथ यात्रेला जेव्हा धोका निर्माण झाला तेव्हा हे सगळे कोठे होते?
संजय राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांनी भाजपवर हल्ला चढविला आहे. ते म्हणाले की, संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले ही महाभयंकर आणीबाणी आहे.