
Mumbai : ‘हे दोघे’ कधी तरी सत्तेतून जाणार; अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी

प्रशांत बारसिंग
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या सरकारमध्ये काम केले आहे, तरीही आघाडी सरकारच्या काळातील विकासकामांना आता स्थगिती देण्याचे काम सुरु आहे. दोघांना असे वाटतंय की आपणच सरकार चालवतोय. हे दोघ काही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाहीत. हे दोघे कधी तरी जाणार आहेत, अशी मिश्कील टिप्पणी विधानसभेतील विरोधी अजित पवार(Ajit Pawar) यांनी सोमवारी केली.
राज्य मंत्रिमंडळळाचा विस्तार न होणे हा जनतेचा अपमान आहे. तुमच्याकडे बहुमत आहे मग विस्तार का करीत नाही?, असा सवाल करताना अजित पवार यांनी लोकशाहीत असे वागून चालत नसल्याचा सल्ला दिला. सरकारमध्ये पालकमंत्रीपदाची जबाबदारी महत्वाची असते. पालकमंत्री(guardian minister) आपत्तीच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतात आणि यंत्रणेला कामाला लावतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजून झालेला नाही. शिवाय शिंदे सरकारने आघाडी सरकारचे निर्णय फिरवून विकासकामांना स्थगिती दिली आहे. या स्थागीतीवरून अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली.
सरकार(Government) ही प्रक्रिया एक आहे. सरकार येत असते आणि जात असते. हे पण सरकार जाणार आहे. मात्र, या सरकारने २०२१ पासूनच्या जिल्हा नियोजन, अर्थसंकल्पातील तसेच अर्थसंकल्पीय प्रकाशनातील कामांना स्थगिती दिली आहे. ही कामे आमची वैयक्तिक नव्हती किंवा घरची नव्हती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या वडूज येथील स्मारकाला २६५ कोटी रुपयांचा निधी देण्याच्या निर्णयाला सरकारने स्थगिती दिली आहे. अष्टविनायक तीर्थक्षेत्रांचा विकास थांबविला आहे. प्रक्रिया सुरु असताना सहकारी संस्थांच्या निवडणुका थांबविल्या आहेत, असे सांगत अजित पवार यांनी राज्यात यापूर्वी खालच्या पातळीवरचे राजकारण कधी झाले नव्हते, अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केली.
अजून भूक संपली नाही
आमच्यात भूकंप(earthquake) होणार नाही. ज्यांनी भूकंप केला त्यांनी राज्य ताब्यात घेतले आहे. आता राज्य चालवून दाखवा. एकनाथ शिंदे यांना घेऊन सरकार आले, तरी तुमची भूक संपली नाही का?, असा सवाल अजित पवार यांनी भाजपला उद्देशून केला. तुम्ही मनावर की छातीवर दगड ठेवून निर्णय घेतला. याबद्दल मी सभागृहातच बोलेन, असेही अजित पवार म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत दोघांच्या हातात काही नाही. जोपर्यंत दिल्लीतून हिरवा कंदील मिळत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल असे वाटत नाही, असेही अजित पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले.