
Mumbai : ‘या’दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : ५ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ विस्तार सायंकाळी ६ वाजता राजभवन येथे होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा ३० जून रोजी राजभवनात पार पडला. त्यानंतर महिना उलटला, तरीही राज्य सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडत नव्हता, त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते.
राजभवन(Raj Bhavan) येथे नव्या मंत्र्यांचा शपशविधी होणार असल्याचेही समजते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यात मंत्र्यांच्या नावाची यादी मंजूर झाली आहे, अशीही माहितीही समोर येत आहे.