spot_img
HomeUncategorizedMumbai : कर्नाक रोड ओव्हरब्रिज तोडण्याच्या कामाच्या तयारीचा सेंट्रल रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी घेतला...

Mumbai : कर्नाक रोड ओव्हरब्रिज तोडण्याच्या कामाच्या तयारीचा सेंट्रल रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी घेतला आढावा

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : अनिल कुमार लाहोटी(महाव्यवस्थापक, सेंट्रल रेल्वे) यांनी दि. १९/२० नोव्हेंबर २०२२ रोजी केल्या जाणाऱ्या कर्नाक रोड ओव्हरब्रिज(Karnak Road Overbridge) तोडण्याच्या कामाच्या तपशिलांचा आढावा घेतला.

अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अनिल कुमार लाहोटी म्हणाले की निर्माण, अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल, ऑपरेटिंग, कमर्शियल आणि आरपीएफ या सर्व विभागांनी ब्लॉकचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. निकामी करण्यासंबंधीची सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत.

अनिल कुमार लाहोटी(Anil Kumar Lahoti) म्हणाले की, ब्लॉक दरम्यान सुरळीत आणि व्यत्ययमुक्त सेवा सुनिश्चित करण्यासाठी, मेल/एक्स्प्रेस गाड्या आणि उपनगरी गाड्यांच्या शॉर्ट टर्मिनेशन/शॉर्ट ओरिजिनेशनची योग्य आणि नियमित घोषणा करण्यात यावी आणि सर्व प्रवाशांना त्यांच्या संबंधित गाड्यांचे शॉर्ट ओरिजिनेशन/शॉर्ट टर्मिनेशनबाबत कळविण्यासाठी बल्क एसएमएसचा(bulk SMS) वापर करण्यावर भर देण्यात यावा.

बैठकीदरम्यान, महाव्यवस्थापकांनी प्रमुख स्थानकांवर हेल्पडेस्कची व्यवस्था आणि प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट आणि मराप महामंडळ(एमएसटिसी) यांच्या समन्वयाने योग्य बसव्यवस्था करण्याच्या सूचनाही दिल्या. सुरक्षेच्या पैलूंची खात्री करून आरपीएफने(RPF) शासकीय रेल्वे पोलीस आणि राज्य पोलिसांशी समन्वय साधून ब्लॉक कालावधीत विविध स्थानकांवर पुरेसे बल कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत, अशी आशा व्यक्त केली.

निष्कासित करण्याच्या तयारीबाबत अनिल कुमार लाहोटी यांनी अधिकाऱ्यांना मशीन्सची पूर्वतपासणी करून त्यांचे योग्य प्रकारे काम करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी मनोज शर्मा[मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण)], मुकुल जैन(प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक), राजेश अरोरा(प्रधान मुख्य अभियंता), एन. पी. सिंग(प्रधान मुख्य विद्युत अभियंता), ए . के. श्रीवास्तव(प्रमुख मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता), अजोय सदानी(प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त), आर. के. गोयल(विभागीय रेल्वे व्यवस्थापक), एच. एस. चतुर्वेदी[मुख्य अभियंता(निर्माण)], इती पांडे[मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक(पीएस)], के. एन. सिंग[मुख्य वाणिज्य व्यवस्थापक(पीएम)] आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर