
Mumbai: सामाजिक न्याय खात्याच्या पुरस्कार वितरणाला मिळेना मुहूर्त

मुकुंद लांडगे
मुंबई : (mumbai) सामाजिक न्याय खात्याच्या पुरस्कार वितरणाला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. राज्य शासनाच्या(state government) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्यांना, तसेच विविध स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवकांना थोर नेत्यांच्या नावाने विविध पुरस्कार दिले जातात. मात्र, गेल्या दोन वर्षाचा कोरोना संसर्गकाळ आणि गेल्या महिन्यातील राजकीय पेचप्रसंग यामुळे हा पुरस्कार वितरण कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. मात्र, आता नवीन सरकार सत्तेवर आल्यामुळे तरी या कार्यक्रमाला मुहूर्त मिळणार का?, असा सवाल अंतिम यादीतील पुरस्कारकर्ते करीत आहेत.
‘हा’ कार्यक्रम अचानक स्थगित करण्यात आला
दरवर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार(Dr. Babasaheb Ambedkar Samajbhushan Award), साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार आणि संस्थाना दिले जाणारे शाहू-फुले-आंबेडकर पारितोषिक, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य हे पुरस्कार दिले जातात. यंदा हे पुरस्कार २६ जून रोजी राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी दिले जाणार होते. तसे परिपत्रकही सामाजिक न्याय विभागाने काढले होते. मात्र, अचानक राजकीय पेचप्रसंग निर्माण झाल्यामुळे हा कार्यक्रम, स्थळ आणि पुरस्कारार्थीच्या प्रस्तावाची अंतिम यादी झाली असतानाही अचानक स्थगित करण्यात आला. विशेष म्हणजे निवड झाल्यानुसार, आपणास पुरस्कार मिळेल या आशेवर राज्यभरातील अनेक संस्थाचालक, साहित्यिक, समाजसेवक आणि कलावंत मुंबईत दाखल झाले होते. मात्र, पुरस्कार वितरण रद्द झाल्यामुळे हिरमोड होऊन त्यांच्यात असंतोष निर्माण झाला असल्याची प्रतिक्रिया साहित्य मंचाचे संस्थापक व अध्यक्ष अशोक रणदिवे यांनी दिली आहे.
दरम्यान, १ ऑगस्ट रोजी होणार्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सांगता समारोहाचे औचित्य साधून तरी हे पुरस्कार वाटप(award should be distributed) करावे, अशी मागणी पुरस्कार निवडीतील कार्यकर्त्यांनी केली आहे.