
Mumbai : ‘त्या’ पोलिसांनी वाचविला एकाचा जीव

मुकुंद लांडगे
मुंबई : (MUMBAI) कुर्ला पूर्वेकडील नेहरू नगर येथील साबळे उड्डाणपुलाखाली काल जखमी अवस्थेत विव्हळत पडलेल्या एका अज्ञात व्यक्तीचा जीव नेहरू नगर पोलिसांनी(Nehru Nagar police) वाचवून त्याला जीवदान दिले आहे. त्यामुळे या कार्यामुळे त्या पोलिसांचे कौतुक होत आहे.
राजावाडी रुग्णालयात केले दाखल
येथील लोकमान्य टिळक टर्मिनन्स लगतच्या साबळे उड्डाणपुलाखाली एक जखमी व्यक्ती पडली होती. याबाबत नेहरू नगर पोलिसांना ही माहिती कळविण्यात आली. त्यानुसार पोलिसांच्या मोबाईल क्रमांक १ या वाहनातून तातडीने या व्यक्तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात(Rajawadi Hospital) दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरूही झाले. आता ती व्यक्ती सुखरूप असून, त्याची ओळख पटविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
समाज माध्यमांवरूनही त्यांचे कौतुक
दरम्यान या व्यक्तीला रुग्णालयात नेत उपचार करण्यापर्यंत नेहरू नगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक भांडवलकर, हवालदार खेडेकर, शिंदे, निगडे यांनी मदत केली. विशेष म्हणजे पोलिसांच्या या सामाजिक भावनेबाबत समाज माध्यमांवरूनही(social media) त्यांचे कौतुक होत आहे.