
Mumbai : ‘त्या’ मुलीचा मृत्यू कोव्हिड लसीकरणामुळे नाही; राज्य वैद्यकीय उपसमितीचा निर्वाळा

धीरज सिंग:
मुंबई (Maharashtra News) [India]: (Mumbai) कोव्हिड लसीकरणामुळे ‘त्या’ १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झालेला नसल्याचा निर्वाळा वैद्यकीय तज्ञांच्या राज्य स्तरीय उपसमितीने दिला आहे.
भारत सरकारने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, १५ ते १७ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे कोव्हिड लसीकरण(covid vaccination) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ३ जानेवारी २०२२ पासून सुरू करण्यात आले आहे. यात, मुंबईतील महानगरपालिका, शासकीय आणि खासगी कोव्हिड लसीकरण केंद्रांवर आजमितीपर्यंत १,४७,९४४ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या वयोगटासाठी फक्त कोवॅक्सिन लसीचा वापर केला जात आहे.
१४ जानेवारी २०२२ रोजी एका व्यक्तीने ट्वीटरवर १५ वर्षीय मुलीचा लसीकरणामुळे मृत्यू झाला, अशी चुकीची बातमी प्रसारित केली. यानंतर या बातमीची सखोल तपासणी करून अहवाल बनविण्यात आला. लसीकरणानंतर घडणार्या प्रतिकूल घटनांची चिकित्सा करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार वैद्यकीय तज्ञांची राज्यस्तरीय उपसमिती, मुंबई विभाग नेमण्यात आली आहे. सदर समितीची तातडीने बैठक आज दि. १७ जानेवारी २०२२ रोजी झाली. सदर घटनेचा अहवाल समिती(covid vaccination) समोर सादर करण्यात आला. सदर मृत्यू लसीकरणामुळे झाला नाही, असे स्पष्ट मत समितीने दिले आहे.