
Mumbai : सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल

सुषमा अंधारे शिवसेनेत करणार प्रवेश
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai) सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘संविधानिक चौकट मानणारे धर्मनिर्पेक्ष लोक, झुंज देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सोबत असले पाहिजेत. माझी पाटी कोरी आहे, माझ्यावर कोणत्याही केसेस नाहीत. भाजपवाल्यांना माझ्यावर अटॅक करण्याची संधी मिळणार नाही. मी कोणत्याही आमिषाला जाऊन शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतलेला नाही. माझी सद्सद्विवेक बुध्दी जागी ठेऊन हा निर्णय घेतला आहे. तुमचा ‘सो कॉल्ड हिंदुत्ववाद’ हा केतकी, कंगना, नुपूर शर्माचा भंपक आहे. मला आंनद आहे की, उद्धव ठाकरे या भ्रमात नाही. या परिस्थितीत मला असे वाटते, शिवसेनेला माझी गरज आहे आणि महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे. हा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही व झुकणार नाही, ही मान ताट ठेवण्यासाठी हा पक्ष प्रवेश करणार.
एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरी नंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. अनेक आमदार, खासदारांसह अनेक नगरसेवक व पदाधिकारी हे शिंदे गटात सामील झाले. मात्र, या परिस्थितीला छेद देत सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे या आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
सामाजिक कार्यकर्ते, फुले-आंबेडकर विचारांनी प्रेरित अशी सुषमा अंधारे यांची ओळख आहे. सद्याची परिस्थिती पाहता या परिस्थितीला छेद देत सुषमा अंधारे यांचा हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे.