
Mumbai : पदोन्नतीमधील आरक्षणासह ‘त्या’ मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन

मराठा आणि ओबीसी आरक्षण रद्द होण्यास जबाबदार महाविकास आघाडी सरकारचा आरपीआयच्या वतीने निषेध मोर्चा
संजय बोर्डे
मुंबई : राज्यात वाढत असलेले एसींवरील अत्याचार रोखावेत, तसेच पदोन्नतीमधील आरक्षण लागू करावे यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज दि. १० मे रोजी बोरीवली तहसील कार्यालयासमोर(Borivali tehsil office) जिल्हाध्यक्ष हरिहर यादव यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात रमेश गायकवाड, अभया सोनवणे, उषा रामलू, संदीप शिंदे, शंकर गुप्ता, अशोक गवळी आदी उपस्थित होते.

मागण्या पुढीलप्रमाणे-
१.राज्यात वाढत असलेले एसींवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी.
२. ज्या झोपडीवासीयांनी सन २०१९ च्या निवडणुकीत मतदान केले आहे अशा झोपडीवासीयांची झोपडी पात्र करावी. २०१९पर्यंतच्या झोपड्या शासनाने अधिकृत कराव्यात.
३. राज्य सरकारने नोकरीमधील मागासवर्गीयांचा अनुशेष भरावा.
४..अनुसूचित जाती-जमातींना, मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे.
५.मराठा समाजातील आर्थिक दुर्बल गरिबांना आरक्षण लागू करावे.
अशा विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे(the Republican Party) आज मंगळवार दि. १०मे रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले असून, राज्यभरात प्रत्येक तहसील आणि जिल्हा अधिकारी कार्यालयावर निदर्शने, मोर्चे काढून आंदोलन करण्यात आले.