spot_img
Homebusiness-mrMumbai : मुंबई/पुणे आणि दानापूर दरम्यान विशेष गाड्या

Mumbai : मुंबई/पुणे आणि दानापूर दरम्यान विशेष गाड्या

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे मुंबई/पुणे आणि दानापूर(Mumbai/Pune and Danapur) दरम्यान विशेष गाड्या चालविणार आहे. याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

मुंबई-दानापूर स्पेशल
03266 स्पेशल दि. १० नोव्हेंबर २०२२ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ००:१५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी ०८:०० वाजता पोहोचेल.

03265 विशेष दि. ८ नोव्हेंबर २०२२ रोजी दानापूर येथून १८:१० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २२:३० वाजता पोहोचेल.

थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.

संरचना: दोन तृतीय वातानुकूलित, १६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन द्वितीय श्रेणी, लगेजसह गार्ड ब्रेक व्हॅन.

पुणे-दानापूर स्पेशल
03288 स्पेशल दि. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे येथून ०५:०० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी ०९:१५ वाजता पोहोचेल.

03287 स्पेशल दि. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी दानापूर येथून १६:४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी २२:३० वाजता पोहोचेल.

थांबे: दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.

संरचना: तीन द्वितीय वातानुकूलित, ९ शयनयान, ७ सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन द्वितीय श्रेणी, लगेजसह गार्ड ब्रेक व्हॅन.

आरक्षण: 03266 आणि 03288 विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे.

प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोव्हिड संबंधित योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला रेल्वेकडून देण्यात येत आहे.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर