
Mumbai: पूर्णा-कोल्हापूर-नांदेड आरआरबी परीक्षार्थींसाठी विशेष ट्रेन

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (mumbai) आरआरबी परीक्षेला(RRB exams) उपस्थित असलेल्या आरआरबी परीक्षार्थींची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे आरआरबी परीक्षार्थींसाठी पुढील तपशिलांनुसार विशेष ट्रेन चालवेल.
07429 विशेष गाडी दि. ७ मे २०२२ (शनिवार) रोजी १२:३० वाजता पूर्णा येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २०:४० वाजता श्रीछत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे पोहोचेल.
07430 विशेष गाडी दि. ९ मे २०२२ (सोमवार) रोजी श्रीछत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून २२:३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०२:३० वाजता नांदेडला पोहोचेल.
थांबे : नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बसर, निजामाबाद, कामरेड्डी, अक्कानापेट, मिर्झापल्ली, मेडचाल, बोलारुम, मलकाजगिरी, काचेगुडा, उमदानगर, शादनगर, जडचेर्ला, महबूबनगर, वानपर्थी रोड, गडवाल, रायचूर, वाडी, कलबुर्गी, सोलापूर, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, सातारा, सांगली आणि मिरज.
संरचना : २ शयनयान, ११ सामान्य द्वितीय श्रेणी.
आरक्षण : सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर 07430 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ८ मे २०२२ पासून सुरू होईल.
प्रवाशांनी(Passengers) स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोव्हिडच्या योग्य वर्तनाचे पालन करण्याची विनंती रेल्वेकडून करण्यात आली आहे.