
Mumbai : …तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार : उद्धव ठाकरे

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकवरुन संवाद साधला. बंड केलेल्या आमदारांनी मला समोर येऊन सांगा, मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले.
शिवसेनेचे(Shiv Sena) ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३३ शिवसेना आमदार गुवाहाटीमध्ये गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, हिंदुत्व सोडल्याची चर्चा सुरू आहे, अस मी काय केले आहे की मी हिंदुत्वापासून बाजूला गेलो आहे. गेल्या अडीच वर्षापासून मुख्यमंत्री पदावर आहे. आता माझ्यासोबत मंत्रिमंडळात आहेत ते बाळासाहेब यांच्यासोबत असणारेच शिवसैनिक आहेत. मला कशाचाही अनुभव नसताना मी जबाबदारी जिद्दीने पार पाडली.
काँग्रेस(Congress) आणि राष्ट्रवादी म्हणाली आम्हाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको आहेत ते बाहेरच्या पक्षातील आहेत समजू शकतो. आज सकाळी मला शरद पवार यांनी फोन केला होता, ते म्हणाले उद्धव आम्ही तुमच्यासोबत आहोत. हे बाहेरची माझ्यासोबत आहेत, मग माझ्याच माणसांना मी मुख्यमंत्री पदी का नको आहे. मग हे सगळ सांगण्यासाठी सुरतला का जावे लागते, बंडखोर केलेल्या एकाही आमदाराने मला समोर येऊन सांगाव मुख्यमंत्री तुम्ही नको, तर मी लगेच मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मी मुख्यमंत्री(Chief Minister) पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी येऊन माझा राजीनामा घेऊन राजभवनात द्या. मला कोरोना झाला आहे म्हणून मी राजभवनात जाऊ शकत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.