
Mumbai: शिवसेनेचे विधिमंडळ गटप्रमुख अजय चौधरीच : नरहरी झीरवळ

राजा अदाटे
मुंबई: (Mumbai) शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजय चौधरी(Ajay Chaudhary) हेच असल्याचा निर्वाळा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झीरवळ(Narhari Jirwal) यांनी दिदला आहे. त्यामुळे आता बंडखोर शिवसेना शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या गटाकडून भरत गोगावले यांचे नाव गटनेते म्हणून निवडण्यात आले होते. मात्र त्याला आता चाप लागला आहे.
प्रतोदपदी सुनील प्रभू यांना मान्यता
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेन त्यांना गटनेते पदावरून काढून अजय चौधरी यांची गटनेते पदावर नियुक्ती केली होती. तर सुनील प्रभू यांना प्रतोद म्हणून नियुक्ती देण्यासंदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे विनंती केली होती. आज या दोघांच्या नियुक्तीला झिरवळ यांनी मान्यता दिली आहे. शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे यांनी स्वतः गटनेता आणि भरत गोगावले यांना पक्षप्रतोद नेमल्याचे व्हीडीओ व्हायरल झाले होते. त्याबाबतचे पत्र ते विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झीरवळ यांच्याकडे पाठवणार होते. मात्र आता अडचण निर्माण झाली आहे.
शिवसेनेकडून आणखी चार आमदारांच्या निलंबनाची
एकनाथ शिंदे गटातील हे चार आमदार कोण? अशी चर्चा असून, या चार आमदारांनाही सुनावणीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. आतापर्यंत शिवसेनेने एकूण 16 आमदारांच्या निलंबनाची याचिका दाखल केली आहे. आणखी सहा आमदारांच्या निलंबनाची याचिका उपाध्यक्षांकडे दाखल करणार असल्याचे शिवसेनेच्या सुत्रांनी सांगितले.
कायदेशीर लढाई होणार
यातून मार्ग काढण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. शिवसेनेच्या गोटातून शरद पवार आणि कायदेतज्ञ यांच्या सल्ल्याने पुढील लढाई सुरू झाली आहे. तर विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ॲड आशिष शेलार यांच्यात खलवतं झाल्याची चर्चा आहे. भाजपकडून शिंदे गटाला कायदेशिर मदत दिली जाणार आहे.