
Mumbai : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून हटवा : काँग्रेस

‘त्यांनी’ तमाम मराठी बांधवांची माफी मागावी : नाना पटोले
दीपक कैतके
चंद्रपूर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून हटवा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात कॉंग्रेस पक्ष(Congress party) आक्रमक झाले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शुक्रवारी मुंबईत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. महाराष्ट्राने गुजराती आणि राजस्थानींचे पालनपोषण केले आहे. अदानी-अंबानी याच राज्यात वाढले. राज्यपालांनी असले विधान करून छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. यासाठी त्यांनी तमाम मराठी बांधवांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच त्यांनी म्हटले की, भाजपने त्यांना परत बोलावले पाहिजे.
अंधेरी (पश्चिम) येथील एका कार्यक्रमात गुजरातींनी मुंबई सोडल्यास मुंबईला पैसे मिळणार नाहीत. मुंबई यापुढे आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणार नाही, असे राज्यपालांनी शुक्रवारी म्हटले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्राबाबत केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत, शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
चंद्रपूरमध्ये(Chandrapur) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनीही राज्यपालांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राने गुजराती आणि राजस्थानी जनतेला काय दिले ते त्यांनी पाहावे, असे नाना पटेल म्हणाले आहे. आज महाराष्ट्राने अदानी-अंबानींना उभे केले आहे. राज्यपाल खुर्चीवर बसून बदलाच्या भावनेने काम करीत आहेत. केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातून नव्या राज्यपालांची निवड करावी, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.