
Mumbai : मुंबई-भुवनेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेसच्या डब्ब्यात कायमस्वरूपी वाढ

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai) रेल्वेने ट्रेन क्रमांक 12879/12880 लोकमान्य टिळक टर्मिनस – भुवनेश्वर सुपरफास्ट एक्स्प्रेसला एक अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच(third air-conditioned coach) जोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिरिक्त कोच लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. २५ जून २०२२ पासून आणि भुवनेश्वर येथून दि. २३ जून २०२२ पासून प्रभावी असेल.
सुधारित संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन, १ जनरेटर व्हॅन आणि १ पँट्रीकार(pantry car).
प्रतीक्षा यादीतील प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी त्यांच्या पीएनआरची स्थिती(PNR status) तपासण्याची विनंती रेल्वेकडून केली जात आहे.