
Mumbai: ही ‘सेना’ नेमकी कोणाची हेच कळत नाही : पृथ्वीराज चव्हाण

लतिका तेजाळे
मुंबई : काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेच्या आजच्या भूमिकेवर शंका आणि आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच ही ‘सेना’ नेमकी कोणाची हेच कळत नसल्याचे ही पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) म्हणाले.
शिवसनेच्या ‘त्या’ भूमिकेवर शंका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपण महविकास आघाडी सोबत राहणार, अशी भूमिका स्पष्ट केली. मात्र, आज संजय राऊत(Sanjay Raut) यांनी माध्यमांसमोर येत एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावावर विचार करण्यास आम्ही तयार आहोत, पण २४ तासाच्या आत आमदाराने परत यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तर दुसरीकडे आधी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडा, मगच चर्चा करू, असे एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी स्पष्ट सांगितल्यांचे सूत्रांकडून कळत आहे. या विचित्र प्रसंगावर काँगेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेच्या आजच्या या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे.