
Mumbai : राष्ट्रवादीची शिवसेनेशी आघाडी

प्रफुल्ल पटेल आणि जितेंद्रआव्हाड गोव्यात जाऊन करणार चर्चा
नितिन तोरस्कर:
मुंबई (Maharashtra News) [India]: (Mumbai) गोवा विधानसभा निवडणुकीत(Goa Assembly elections) राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि जितेंद्र आव्हाड उद्या गोव्यात जाऊन आढावा घेणार आहेत. त्यानंतर शिवसेनेशी जागा वाटपावर चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक(NCP leader Nawab Malik) यांनी ही माहिती देताना सांगितले की, निवडणुकांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार उत्तर प्रदेशात आमची समाजवादी पार्टीशी आघाडी झाली आहे. सपाने आम्हाला एक जागा सोडली असून, अजूनही काही जागा सोडण्याची शक्यता आहे. मणिपूरमध्येही काँग्रेससोबत आघाडी झाली आहे. गोव्यात आघाडी करण्याबाबत काँग्रेससोबत चर्चा झाली होती, पण काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाची आघाडीची इच्छा नाही. त्यामुळे उद्या प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड दोन्ही नेते गोव्यात जाणार आहेत. शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत आघाडीची इच्छा आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा होईल. त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.