
Mumbai : ‘तेथील’ अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई

संजय बोर्डे
मुंबई : कांदिवली (पू.) गांधीनगर व दुर्गानगरमधील बुद्धविहाराच्या(Buddha Vihara) नियोजित जागेवर काही लोकांनी झोपड्या बांधल्या होत्या. स्थानिक बौद्ध समाजाने या अनधिकृत बांधकामाला कडाडून विरोध केला. कुरार पोलिसांत लेखी तक्रार केली. कुरार पोलिसांनी याची दखल घेत पालिकेच्या निष्कासन विभागाला कळवून सदर जागेवरील अनधिकृत बांधकाम तोडले. चाळीस वर्षांपासून सदर जागेवर स्थानिक बौद्ध समाजाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात. मात्र, काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी धार्मिकतेढ निर्माण करण्याच्या हेतूने सदर जागेवर खाजगी बांधकाम करण्यास सहकार्य केले होते, मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला, त्यामुळे बौद्ध समाजात आनंद व्यक्त होत आहे.
याठिकाणी समाजाच्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. येथे बुद्धविहारच बांधले जाईल. त्याकरिता आपण प्रयत्नशील राहू, असे संजय बोराडे (दिंडोशी महासचिव) यांनी म्हटले.त्या जागेवर कोणतेही अनधिकृत(unauthorized) बांधकाम होता कामा नये. सदर नव्याने केलेले बांधकाम अनधिकृत असून, ते तोडण्याबाबत आम्ही पालिकेला कळविले होते, असे सतीश गाढवे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कुरार पोलीस ठाणे) यांनी म्हटले आहे,