
Mumbai : २२ हजारांपेक्षा अधिक वाहनचालकांचे परवाने रद्द

पोलिसांची ४ महिन्यांतील कारवाई
मुकुंद लांडगे
मुंबई : (Mumbai) नियम तोडून वाहने चालविल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी(The traffic police) तब्बल २२ हजार ८२८ वाहनचालकांवर कारवाई करीत त्यांचे ड्रायव्हिंग लाइसेंस रद् केली आहेत. गेल्या मार्चपासून ते आत्तापर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे.
वाहनचालकांना वाहतूक शिस्त लावण्यात येत आहे
बेदरकारपणे वाहने चालवून ट्राफिक जाम केल्याचा या वाहनचालकांवर आरोप आहे. तर यापुढेही अशाप्रकारच्या चालकांवर ही कारवाई सुरूच राहील, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगत आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे(Sanjay Pandey) यांच्या आदेशनुसार, ही कारवाई सुरू झाली असून, या वाहनचालकांना वाहतूक शिस्त लावण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविणारे चालक सध्या आयुक्तांच्या कारवाईतील महत्वाचे टार्गेट असून, त्यांच्यावर खास कारवाई करण्याचा धडाका सुरू आहे.
बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्यांना बसेल चाप
दरम्यान, मुंबईमध्ये(Mumbai) गेल्या १ मार्चपासून आजतागायत सुमारे २२ हजारांपेक्षा जास्त जणांवर कारवाई करण्यात आली आहे, तर ६६ हजार २१३ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. यामुळे बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्यांना आता चाप बसेल, असे पोलिसांनी सांगितले. तर दुसरीकडे आडवी-तिडवी वाहने चालवून वाहतुकीस खोळंबा करणाऱ्यांनाही चाप लावणार आहे.
भंगारमधील वाहनांची मोठी समस्या
वाहतुकीत खोळंबा करण्याचे काम भंगार वाहनांकडून(vehicles) होत असल्याने अशा वाहनांवर कारवाई करीत तब्बल १४ हजार ३५३ वाहने रस्त्यावरून हटविण्यात आली आहेत. तर संजय पांडे यांनी आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर ही कारवाई सुरू केली आहे. यात जुनाट वाहने हटविणे, विरुद्ध दिशेने गाडी चालविणे यासाठी थेट गुन्हे दाखल केले जात आहेत, तर विनाकारण हॉर्न वाजविणे यावरही कारवाई केली जात आहे. तसेच मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेरच्या फेरीवाल्यांना हटविण्याची मोठी कारवाई करण्यात आली आहे.