
Mumbai : मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस आणि मुंबई-गदग एक्सप्रेसचे एकत्रीकरण

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : सेंट्रल रेल्वेकडून ट्रेन क्र. 11029/11030 मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस आणि 11139/11140 मुंबई-गदग एक्स्प्रेस यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. प्रत्येकासमोर नमूद केलेल्या तारखांना(dates) सुधारित संरचना पुढीलप्रमाणे आहेत-
11030 कोयना एक्सप्रेस दि. २९ जून २०२२ पासून.
11029 कोयना एक्सप्रेस दि. १ जुलै २०२२ पासून.
11039 मुंबई-गदग एक्सप्रेस दि. २९ जून २०२२ पासून.
11140 गदग-मुंबई एक्सप्रेस दि. ३० जून २०२२ पासून.

सुधारित संरचना : एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, दोन वातानुकूलित चेअरकार, ४ शयनयान, एक सामान्य द्वितीय श्रेणी, ४ सामान्य द्वितीय आसनश्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण : ट्रेन क्र.11030/11029 आणि 11139 च्या अतिरिक्त डब्यांसाठी बुकिंग दि. २२ जून २०२२ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irct.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
प्रवाशांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोव्हिडबाबतच्या योग्य वर्तनाचे पालन करण्याची विनंती रेल्वेकडून(the Railways) करण्यात येत आहे.