
Mumbai : कल्याण-कसारा रेल्वेसेवा ठप्प

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : सेन्ट्रल रेल्वेची(Central Railway) कसारा ते कल्याण वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळ एका मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ही मालगाडी रेल्वे रुळावरच उभी आहे, त्यामुळे कसाऱ्याहून कल्याणकडे जाणारी वाहतूक बंद आहे.
अशात कसाऱ्याहून कल्याणकडे निघालेली लोकल ट्रेन उंबरमाळी(Umbarmali) स्टेशनला उभी आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी एक तास लागण्याची शक्यता आहे. ऐनगर्दीच्यावेळी रेल्वेसेवा ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले असून, स्टेशनवर मोठी गर्दी दिसत आहे.