
Mumbai : सेंट्रल रेल्वेच्या मुंबई उपनगरी ट्रेन(लोकल)मध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : सेंट्रल रेल्वेने(Central Railway) दि. २१ जून २०२२ रोजी हिल स्टेशनच्या समन्वयाने मुंबई लोकल ट्रेनमध्ये योगाभ्यास करण्याच्या अनोख्या पद्धतीने ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस- २०२२’ साजरा केला.
प्रवाशांसोबत ट्रेनमध्ये योगाभ्यास
मुंबईतील ७५ योग शिक्षकांच्या Hill-Station टीमने लोकल ट्रेनमध्ये योग शिकविला. प्रथम, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सुरुवात केली, जिथे त्यांनी दादरपर्यंतच्या(Dadar) सत्रात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसोबत ट्रेनमध्ये योगाभ्यास केला. इतरत्र काही सत्रे पूर्ण करून हा संघ पुन्हा मुंबई लोकल ट्रेनमध्ये शीव स्थानकापर्यंत आणखी एका सत्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला परतला.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे प्रवाशांनी कौतुक केले आहे.