
Mumbai : ‘त्या’ कर्मचाऱ्यास बेदम मारहाण करणारा फरार

मुकुंद लांडगे
मुंबई : (Mumbai) नोव्हेंबर २०२१ पासून थकीत असलेली रक्कम वसूल करण्यास गेलेल्या अदानी इलेक्ट्रिक कंपनीच्या(Adani Electric Company) एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर फिर्यादी रुग्णालयात असताना आरोपी मात्र फरार झाला आहे. इरफान अब्दुल हमीद खान असे आरोपीचे नाव आहे.
सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सांताक्रूझ (पश्चिम) भागात राहणाऱ्या आरोपीचे गेल्या नोव्हेंबर २०२१ पासून अदानी कंपनीचे ५ हजार ३२० रुपये थकीत वीजबिल होते. ते वसूल करण्यासाठी फिर्यादी आणि अदानी कंपनीचे कर्मचारी मसूद अहमद मुस्तकिन खान हे काल सकाळी (२० जून) तेथे गेले होते. त्यावेळी आरोपीने त्यांच्याशी बाचाबाची करीत त्यांना बेदम मारहाण केली. त्यात त्यांच्या नाकाला, तोंडाला आणि डोक्याला दुखापत झाली. याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात(SantaCruz Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी या घटनेनंतर फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.