
Mumbai : पुणे आणि वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन दरम्यानच्या उन्हाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पुणे(Pune) ते वीरांगणा लक्ष्मीबाई स्थानकादरम्यान साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
01921 विशेष पुणे येथून दि. ७ जुलै २०२२ आणि १४ जुलै २०२२ (२ फेऱ्या) रोजी १५:१५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी ०९:३५ वाजता वीरांगणा लक्ष्मीबाई स्थानकात(Veerangana Laxmibai station) पोहोचेल.
01922 विशेष वीरांगणा लक्ष्मीबाई स्थानकातून दि. ०६ जुलै २०२२ आणि १३ जुलै २०२२ (२ फेऱ्या) रोजी १२:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११:३५ वाजता पोहोचेल.
या विशेष ट्रेनचे थांबे आणि संरचनेमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आरक्षण : विशेष ट्रेन क्रमांक 01921 साठी विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू आहे.
याबाबतच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे.
प्रवाशांना(Passengers) स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोव्हिड संबंधित योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे.