
Mumbai : दादर-काझीपेठ विशेष रेल्वे सेवेचा विस्तार

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : दादर ते काझीपेठ दरम्यान विशेष शुल्क आकारून विशेष रेल्वे सेवा वाढविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
07198 दादर-काझीपेठ स्पेशल आता 03 जुलै 2022 ते 25 सप्टेंबर 2022 पर्यंत धावेल.
07196 दादर-काझीपेठ स्पेशल आता 07 जुलै 2022 ते 29 सप्टेंबर 2022 पर्यंत धावेल.
07197 काझीपेठ-दादर स्पेशल आता ०२ जुलै २०२२ ते २४ सप्टेंबर २०२२ पर्यंत धावेल.
07195 काझीपेठ-दादर स्पेशल आता 06 जुलै 2022 ते 28 सप्टेंबर 2022 पर्यंत धावेल
वरील गाड्यांची वेळ, रचना आणि थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नाही.
आरक्षण : विशेष ट्रेन क्रमांक 07198 आणि 07196 च्या विस्तारित प्रवासासाठी बुकिंग आधीच सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाईटवर विशेष शुल्कावर सुरू झाले आहे.
या विशेष गाड्यांची वेळ आणि थांबा याबद्दल तपशीलवार माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे.