spot_img
HomeUncategorizedMumbai : गुन्हे रोखून कायदा सुव्यवस्थेवर देणार भर

Mumbai : गुन्हे रोखून कायदा सुव्यवस्थेवर देणार भर

Mumbai: Emphasis on law and order by preventing crime

पोलीस उपआयुक्त पुरुषोत्तम कराड यांचा निर्धार
मुकुंद लांडगे
मुंबई : (Mumbai)
आपल्या परिमंडळातील ७ पोलीस ठाण्यांच्या अखत्यारीत संभाव्य घडणारे गुन्हे रोखून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यावर आपला भर असेल असा निर्धार परिमंडळ-७ चा नुकताच पदभार स्वीकारलेले पोलीस उपआयुक्त(Deputy Commissioner) पुरुषोत्तम कराड यांनी केला आहे. तर, तरुण आणि नव्या पिढीला नशामुक्त करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातील, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

याच आठवड्यात पुरुषोत्तम कराड यांनी या परिमंडळाचे पोलीस उपआयुक्त म्हणून पदभार स्वीकारला असून, त्यांनी आपल्या कामाचा धडाका लावला आहे. या परिमंडळातील घाटकोपर आणि पंतनगर पोलीस ठाण्याच्या(Pantnagar police station) अखत्यारीत अंमली पदार्थांची देवाण-घेवाण करणारे आणि त्यातून घडणारे गुन्हे यावर तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुणी यांच्याबाबत सजग राहण्याचे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. त्यासाठी निर्भया पथकांनाही मार्गदर्शन करण्यात येत आहे. या परिमंडळातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी मोडून काढण्याला आपले प्राधान्य असणार आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या परिमंडळात पदभार स्वीकारण्याआधी कराड हे नवी मुंबई वाहतूक शाखेत उपआयुक्त पदावर कार्यरत होते. पनवेल, उरण तसेच नवी मुंबई(Navi Mumbai) याठिकाणी रोज १ हजार ५०० वाहन चालकांवर कारवाई केली जात होती, तर त्यापूर्वी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भाग असलेल्या भामरागड येथेही आव्हानात्मक परिस्थितीत कर्तव्य पार पाडले आहे. सोलापूर ग्रामीण पोलीसदलातही तत्कालीन पोलीस अधीक्षक अमितेशकुमार यांच्या काळात उपधीक्षकपदी काम करताना त्यांनी जिल्ह्यातील भल्याभल्या गुन्हेगारांना वठणीवर आणले होते. अत्यंत शिस्तप्रिय सेवा बजावणारे आणि संवेदनशील मनाचे अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर