
Mumbai : एकनाथ शिंदेंची वेळ संपली, आता आमची सुरू : संजय राऊत

प्रशांत बारसिंग :
मुंबई: (Mumbai)शिवसेनेतून बंड केलेले नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena rebel leader Eknath Shinde) यांना मुंबईत येऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्याचे आवाहन केले होते, आम्ही त्यांच्या प्रतिसादाची वाट बघितली मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही, आता एकनाथ शिंदेंची वेळ संपली असून आमची वेळ सुरू झाली आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आव्हा आव्हान दिले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राऊत मध्मांशी बोलत होते. बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेना सचिव अनिल देसाई उपस्थित होते.
संजय राऊत म्हणाले की, अब हार नही मानेंगे, आता आमची वेळ आहे. महाविकास आघाडीचे सरकार मजबूत आहे. पुढची अडीच वर्ष आमचेच सरकार पूर्ण करणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. शिंदेंना दिलेली वेळ निघून गेली आहे. लढाई रस्त्यावर झाली तरीही आम्हीच जिंकू, असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना नव्याने चॅलेंज केले.
राऊत म्हणाले, माझी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा झाली. आम्ही पूर्ण तयारी केली आहे. महाविकास आघाडी मजबूत आहे. आमचे महाविकास आघाडी सरकार पुढील अडीच वर्ष पूर्ण करेल आणि पुन्हा सत्तेत येईल असेही राऊत म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीने आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन करुन सांगतो, आम्हाला हार मान्य नाही. आम्हीच जिंकणार असल्याचा निर्धार राऊत यांनी केला आहे. विधिंमंडळात देखील आम्ही जिंकू असेही राऊत यावेळी म्हणाले.
मुंबईत येऊन सामना करावा
शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना चॅलेंज केले आहे. ज्यांना आमचा सामना करायचा आहे, त्यांनी मुंबईत येऊन आमच्याशी सामना करावा, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला.
त्या लोकांनी अत्यंत चुकीचा निर्णय घेतला
एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड करून काही आमदारांनी अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यांना आम्ही चर्चा करण्याची संधी दिली होती. आता मात्र वेळ निघून गेला आहे. त्यामुळे आम्ही आता लढायला तयार असल्याचे राऊत म्हणाले. यशवंतराव चव्हाण सेंटर याच इमारतीमधून महाविकास आघाडीची घोषना झाली होती, याच इमारतीत महायुतीचे बंधन बांधण्यात आले. आता याच इमारतीमधून मी सांगत आहे की, महाविकास आघाडी मजबूत आहे आणि हे सरकार पुढील अडीच वर्ष पूर्ण करेल. तसेच २०२४ साली देखील हेच सरकार पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे.