
Mumbai : मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला एकनाथ शिंदे यांचे उत्तर

महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे!; एकनाथ शिंदे यांचे ट्वीट
प्रशांत बारसिंग
गुवाहाटी : पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असून, महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे असल्याचे सांगत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी आघाडीतून बाहेर पडण्याच्या भूमिकेचा पुनुरुच्चार केला आहे.
मुख्यमंत्री(Chief Minister) उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांबाबत भूमिका मांडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज हे ट्वीट केले. गेल्या अडीच वर्षात आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षाना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे, शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकर, असे त्यांनी म्हटले आहे.