
Mumbai : राज्यात पूरस्थितीमुळे ११० नागरिकांचा मृत्यू!

एनडीआरएफ आणि एसडीआरएफची एकूण 14 पथके तैनात
प्रशांत बारसिंग
मुंबई : (Mumbai) राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे(heavy rains) आतापर्यंत ११० नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले असून, खबरदारीचा भाग म्हणून कोकणासह अतिवृष्टीच्या ठिकाणी शासनाने आपत्ती व्यवस्थापन तुकड्या तैनात केल्या आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून, पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ(NDRF) व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची मुंबईत(कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) – २, पालघर – १, रायगड-महाड – २, ठाणे – २, रत्नागिरी-चिपळूण – २, कोल्हापूर – २, सातारा – १, एनडीआरएफ अशी एकूण १२ पथके तैनात आहेत. तसेच नांदेड – १, गडचिरोली – १ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल(एसडीआरएफ)च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती
राज्यात(in the state) १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व ३०९ गावे प्रभावित झाली असून, ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत व १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नगरिकांनी आपला जीव गमाविला आहे, तर २१८ प्राणी दगाविले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ८६ घरांचे अशंत: नुकसान झालेले आहे.
राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून(state disaster control room) आज सकाळी 11 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार, हा अहवाल शासनाकडून प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.