
Mumbai: ‘त्या’ रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिका कौतुक सोहळा

मुकुंद लांडगे
मुंबई : (mumbai) घाटकोपर पूर्वेकडील(Ghatkopar East) महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात आज दुपारी ‘जागतिक परिचारिका दिन'(‘World Nurses Day’) साजरा करीत येथील डॉक्टर आणि परिचारिका यांचा कौतुक सोहळा पार पडला. यावेळी डॉक्टर, नर्सेस तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येथील रुग्णालयाच्या दक्षता समितीवर असलेले शिवसेनेचे माजी उपविभाग प्रमुख प्रकाश वाणी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी परिचरिकांना(the nurses) पुष्पगुच्छ, चॉकलेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. अलका माने, डॉ. सचिन पैयनवार, डॉ. भारती राजुलवाल, मेट्रेन चंदने, दक्षता समिती सदस्य प्रकाश वाणी, विलास लिगाडे, सचिन भांगे हे खास करून उपस्थित होते, तर यावेळी मोठ्या प्रमाणात परिचारिकाही उपस्थित होत्या.

दरम्यान, राजावाडी रुग्णालयात रुग्णांना सर्वोत्तोपरी मदत करणाऱ्या आणि कोरोना काळात जीवाची बाजी लावत काम करणाऱ्या सर्व परिचारिकांना प्रकाश वाणी(Prakash Vani) यांनी त्यांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. आजच्या धावपळीच्या काळात आम्हाला आठवणीने परिचारिका दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आलेल्या प्रकाश वाणी आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांचे मेट्रेन चंदने यांनी आभार व्यक्त केले. या कार्यकर्त्यांनी कोरोना काळात डॉक्टरांनी आणि परिचारिकांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा केली आहे, त्यामुळे त्यांचे आभार मानले.