
Mumbai: राणा दाम्पत्याला तुरुंगात टाकण्याची सुपारी ‘त्यांनी’ घेतली होती का? : किरीट सोमैय्या

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (mumbai) मनसुख हिरेन यांचे कुटुंब आता थोड स्थिराविले आहे. त्यांच्याशी मी चर्चा केली, त्यानंतर ते ठीक आहेत. मनसुख हिरेन वसुलीखोर असल्याचे चित्र ठाकरे सरकारने तयार केले होते, त्यामुळे हिरेन कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागला होता. दरम्यान, वाझेंना आणि प्रदीप शर्मा यांना पुन्हा पोलीस दलात आणणाऱ्यांची चौकशी केली पाहिजे. पुढच्या आठवड्यात मी एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटणार असून, आता एकच चार्जशीट दाखल झाली आहे. यापुढे अजून होऊ शकतात. हिरेन प्रकरणात कोणकोणते अधिकारी होते ते उघड करणार, असा इशारा किरीट सोमैय्या(Kirit Somaiya) यांनी आज शनिवारी दिला आहे.

ज्याने हा गुन्हा लावला त्यावर कारवाई होणार का?
दरम्यान राणा दाम्पत्यावर(Rana couple) राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊच शकत नाही. आता ज्याने हा गुन्हा लावला त्यावर कारवाई होणार का? त्याचे संजय पांडे आणि दिलीप वळसे पाटील यांनी आता उत्तर द्यावे. नवनीत आणि रवी यांना आत टाकण्याची सुपारी संजय पांडे यांनी घेतली होती का?, नगराळे यांची बदली का केली गेली?, असे अनेक प्रश्न किरीट सोमैय्या यांनी उपस्थित केले.
भाजप काढणार त्यांची एक ‘काळी पुस्तिका’
गेली अनेकवर्षे माफिया सेना या ठाणे महापालिकेत सत्तेत आहे. अनेक वर्ष घोटाळे झाले, आता गेल्या पाच वर्षात जे घोटाळे झाले, त्याची एक ‘काळी पुस्तिका'(‘black book’) भाजप काढणार आहे. मुंबईप्रमाणे ठाण्यात देखील पोलखोल सभा होणार आहे. ५० प्रकारचे घोटाळे आहेत, ते सर्व नागरिकांसमोर आम्ही आणू, असा इशारा सोमैय्या यांनी दिला.