
Mumbai : सहमुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अनिल वळवी यांचे निधन

प्रशांत बारसिंग
मुंबई : तब्बल २० वर्षे राज्यातील सार्वत्रिक निवडणुका पार पाडणारे राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी तथा सामान्य प्राशासन विभागाचे उपसचिव अनिल वळवी यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने(Heart attack) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मंत्रालयात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानरिषदेच्या निवडणुका राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात होत असतात. या खात्याचे अनिल वळवी सहमुख्य निवडणूक अधिकारी होते. तब्बल वीस वर्षे अनिल वळवी यांनी सार्वत्रिक निवडणुका पार पाडल्या आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्याबाबतीत चालता बोलता इतिहास म्हणून त्यांची ओळख होती. अतिशय प्रतिकूल परिस्थिती आणि आश्रमशाळेत(Aashram school) शिकून ते वरिष्ठ पदापर्यंत पोहचले होते.