
Mumbai : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कॅबिनेटच्या बैठकीला हजेरी लावणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. परंतु, मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
त्यांच्याशी फोनवरुन चर्चा
यासंदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ(Kamal Nath) यांनी सांगितले की, उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाली असून, माझी त्यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली. काँग्रेस महाविकास आघाडी सरकारच्या पाठिशी राहील, असे आश्वासन दिले आहे. भाजपने झारखंड, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेशात ज्या प्रकारे पैसा आणि पदाचे राजकारण केले तसाच प्रकार महाराष्ट्रातही सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत एकता कायम राहील याचा आम्हाला विश्वास आहे.
दरम्यान कमलनाथ आणि शरद पवार(Sharad Pawar) यांच्यात बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देखील अपेक्षित होते, परंतु कोरोना झाल्यामुळे ते या बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत.