
Mumbai : मुंबई-तिरुवनंतपूरम नेत्रावती एक्सप्रेसच्या संरचनेत बदल

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपूरम नेत्रावती एक्स्प्रेसच्या संरचनेत तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी कोचचा(economy coach) समावेश करून बदल करण्याचा निर्णय घेतला आहे-
16345 लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपूरम नेत्रावती एक्सप्रेस जसीओ दि. १३ सप्टेंबर २०२२ पासून.
16346 तिरुवनंतपूरम-लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस जेसीओ दि. ११ सेप्टेंबर २०२२ पासून.
सुधारित संरचना : दोन द्वितीय वातानुकूलित, सहा तृतीय वातानुकूलित, एक
तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी, ८ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी, एक पॅन्ट्री कार आणि २ जनरेटर व्हॅन.
प्रवाशांना(Passengers) स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोव्हिड संबंधित योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.