
Mumbai : अमृत संस्थेसाठी पदांना मान्यता

प्रशांत बारसिंग
मुंबई : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी(students) स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नत व प्रशिक्षण प्रबोधन (अमृत) या संस्थेच्या ३ नियमित व १७ कंत्राटीपदांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
यासाठी खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल(economically weaker) युवक आणि युवतींचा विकास घडविण्यासाठी महाज्योतील संस्थेच्या धर्तीवर अमृत ही नवीन संस्था २०१९ मध्ये स्थापन करण्यात आली आहे.