
Mumbai : अनिल देशमुखांच्या कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ

नितिन तोरस्कर:
मुंबई (Maharashtra News) [India]: (Mumbai) शंभर कोटी वसुलीच्या आरोपात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. आज त्यांची कोठडी संपणार होती. गेल्या ८० दिवसांपासून देशमुख कोठडीत आहेत. गेल्या १० जानेवारीला न्यायालयाने देशमुखांच्या कोठडीत १० दिवसांची वाढ केली होती. त्यानुसार आज त्यांची कोठडी संपणार होती. मात्र, न्यायालयाने(the court) त्यांच्या कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ केली आहे. सध्या देशमुख हे ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.
मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या घरावर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाने(ED, CBI and Income Tax Department) छापेमारी केली. देशमुख बरेच दिवस अज्ञातवासात होते. शेवटी ते स्वतःच ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली होती.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर यांनी केला होता. यानंतर सचिन वाझेवर(Sachin Waze) देखील कारवाई करण्यात आली होती, तसेच देशमुखांच्या खासगी सचिवांना देखील अटक करण्यात आली होती.