spot_img
Homecrime-mrMumbai : बतावणी करून लुटणाऱ्या सराईतास केली अटक

Mumbai : बतावणी करून लुटणाऱ्या सराईतास केली अटक

त्याच्यावर मुंबईसह राज्यभरात गुन्हे आहेत दाखल

मुकुंद लांडगे
मुंबई : बतावणी करीत नागरिकांना लुटणाऱ्या आणि मुंबईसह(Mumbai) राज्यभरातील पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत चोरट्यास पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा-७ ने अटक केली आहे. सुनील विठ्ल मावरे असे त्याचे नाव असून, त्याच्यावर पंतनगर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे.

बतावणी करून(pretending) फसवणूक केलेल्या या आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस आले आहेत. सुनिल विठ्ठल मावरे ऊर्फ राहुल खिल्लारी ऊर्फ देवीदास रामदास मावरे अशी त्याची विविध नावे आहेत. तो मूळचा लक्ष्मीनगर झोपडपट्टी, अकोला रेल्वे स्टेशनजवळ राहणारा असून, बतावणी करीत लुटण्यासाठी तो मुंबई आणि राज्यभरात फिरत होता.

असाच प्रकार केल्याने त्याच्यावर पंतनगर पोलीस ठाणे, गु.र.क्र. 734/2022, भादवि कलम 420, 34 अन्वये गुन्हा दाखल होता. त्याने एका वयोवृध्द व्यक्तीस शेठला मुलगा झाला असून, त्यानिमित्त फुकट धान्य आणि साडया वाटप चालु आहे, असे सांगितले. यावेळी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने(gold ornaments) काढून घेवून पलायन केले होते.

दरम्यान, तेव्हापासून पोलीस महिनाभर त्याच्या मागावर होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमार्फत शोध घेत असताना सदरचा आरोपी हा विरार फाटा(Virar Phata), पालघर परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश शेलार यांना मिळाली. तेथे सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला राजावाडी रूग्णालय येथे वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी पंतनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

अनेक गुन्हे दाखल

मुंबई व ठाणे(Thane) परिसरात त्याने अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत. पंतनगर पोलीस ठाणे, घाटकोपर पोलीस ठाणे, नेहरूनगर पोलीस ठाणे, साकीनाका पोलीस ठाणे, मेघवाडी पोलीस ठाणे, विक्रोळी पोलीस ठाणे येथे ४ गुन्हे दाखल आहेत. तर, निर्मल नगर पोलीस ठाणे, भाग्यनगर पोलीस ठाणे, नांदेड येथेही त्याच्यावर असे गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्यासह पोलीस निरीक्षक सुधीर जाधव, ओलेकर, रामदास कदम, महेश शेलार यांच्यासह अंमलदार दीपक पवार, बल्लाळ, प्रमोद जाधव, राऊत, होनमाने यांनी केली.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर