
Mumbai: वाहतूक नियम तोडणाऱ्या 5 लाख जणांवर कारवाई

दोन महिन्यांतील कारवाई
मुकुंद लांडगे
मुंबई – (mumbai) वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या तब्बल 5 लाख जणांवर मुंबई पोलिसांनी(Mumbai Police) गेल्या दोन महिन्यात कारवाई केली आहे. गेल्या 6 मार्च ते 7 मेपर्यंत ही कारवाई करत वाहतूक पोलिसांनी 10 हजार 931 वाहन चालकांवर चुकीच्या दिशेने गाडी चालवण्याच्या आरोपाखाली कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबई वाहतूक शाखेचे सह आयुक्त राजवर्धन(Rajvardhan) यांच्या म्हणण्यानुसार चुकीच्या दिशेने वाहन चालविणाऱ्यावर चलान कापण्याशिवाय इतरही कारवाई होऊ शकते. तर त्यांच्यावर वाहतूक नियमानुसार भांदवीच्या विविध कलमान्वये प्राथमिक कारवाई होऊ शकते. त्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात न्यावे लागणार आहे. त्यामुळे तो चालक असा गुन्हा पुन्हा पुन्हा करणार नाही असेही त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांच्या कारवायातून रोज प्रत्येक पोलीस ठाण्यात सरासरी ५ ते ७ तक्रारी दाखल होत आहेत. तर दुसरीकडे वाहतूक पोलिसांनी आता आपले लक्ष रेल्वे स्थानक(railway station) परिसरात केंद्रित केले आहे. त्यामुळे तक्रारदार नागरिकांना पती चालत येवून सहजपणे आपली तक्रार नोंदवता येईल. याचाच एक भाग म्हणून अशा परिसरातून तब्बल ७७ हजार ९१२ वाहनांच्या विरोधात कारवाया करण्यात आल्या आहेत.
तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इतर कारवाईचा तपशील देताना सांगितले की, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे आणि बिना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या विरोधात कारवाई करताना त्यांची लायसन्स रद्द करण्यात आली आहेत. असे ६ हजार ८३९ जणांवर वीणा हेल्मेट आणि ३ हजर ४२४ जणांवर चुकीच्या दिशेने गाडी चालवणे या आरोपावरून ड्राईविंग लायसन्स रद्द करण्याची मागणी पोलिसांनी वरिस्थंकडे केली आहे. विशेष म्हणजे जास्तीत जास्त दुर्घटना या हुकीच्या दिशेने गाडी चालवण्यामुळे होत असल्याचे वाहतून पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे वीणा हेल्मेट मोटासायकलस्वार यांच्यावरही करडी नजर ठेवली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहेत.