
Mumbai : ‘त्या’ पदाधिकाऱ्यांवर कारवाई

मुकुंद लांडगे
मुंबई(Maharashtra news) [India]: (Mumbai ) धारावीतील खांबदेवनगर(Khambdevnagar) भागातील काहीजणांना पोलिसांनी महाआरतीचे आयोजन केल्याप्रकरणी काल ताब्यात घेतले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी औरंगाबाद येथील सभेत ४ एप्रिलपासून अजान भोंगाविरुद्ध हनुमान चालिसाचा आदेश दिल्यानंतर मनसैनिक रस्त्यावर उतरले. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे.
राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कारवाई करण्याची मागणी केली होती. अन्यथा आम्हीही महाआरती करू आणि भोंगे लावू असे म्हटले होते. त्याचाच एक भाग म्हणून काल खांबदेव मंदीर, खांबदेवनगर, धारावी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी महाआरतीचे आयोजन केले होते. त्यामुळे धारावी पोलिसांनी महिला व पुरुष पदाधिकारी आणि सैनिकांची रवानगी पोलीस ठाण्यात केली. त्यात उपविभाग अध्यक्ष कौशिक कोळी, वार्ड क्रमंक १८४ चे शाखा अध्यक्ष संदीप कदम, वार्ड क्रमंक १८३ चे शाखा अध्यक्ष संदीप कवडे आणि प्रमोद रसाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सूचना दिल्या आहेत.

यावेळी विभाग अध्यक्ष राजेश सोनवणे, उपविभाग अध्यक्ष विजय पोळ, शाखा अध्यक्ष एस. रमेशकुमार, दीपक खारवी, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना उपचिटणीस ईश्वर ताथवडे, प्रकाश कदम, संदेश हरियान,अंजप्पा, महिला विभाग अध्यक्षा जयश्री गोरखे, उपविभाग अध्यक्षा भारती कळंबे, महिला सचिव भाग्यश्री बोराडे, सुरेखा भगत, महिला शाखा अध्यक्षा संध्या डोईफोडे, वार्ड क्रमांक १८३ च्या महिला शाखा अध्यक्षा अक्का व इतर अनेक महाराष्ट्र(Maharashtra) सैनिक महिला, पुरुष यांच्यासोबत इतर पक्षातील नागरिकही यावेळी सहभागी झाले होते.