
Mumbai : मावळ तालुक्यातील ‘त्या’ मुलीवर अत्याचार

नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांना दिले कारवाईचे निर्देश
प्रशांत बारसिंग
पुणे : पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घेटनेची विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, आरोपींवर कडक कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. यावर पोलीस महासंचालक(Director General of Police) रजनीश शेठ यांनी सदरील घटनेतील आरोपीला अटक केले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून त्या मुलीस न्याय देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली आहे.

पुण्याच्या मावळ तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे(Neelam Gorhe) यांनी गंभीर दखल घेतली आहे. यात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबियांशी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्यामार्फत 3 ऑगस्ट रोजीच दूरध्वनीवरून संपर्क करीत सांत्वन केले असून, आरोपीला कडक शिक्षा केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्याचबरोबर कुटुंबियांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचेही सांगितले.
यातील आरोपी तेजस दळवी याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर आरोपीची आई सुजाता दळवी यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले असता तिलादेखील अटक करण्यात आली आहे.
याचसंदर्भात डॉ. नीलम गोऱ्हे व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने 4 ऑगस्ट रोजी पोलीस महासंचालक यांची भेट घेऊन आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत निवेदन देऊन विनंती केली होती. याबाबत पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी आरोपीला अटक केली असून, बाकीची कायदेशीर प्रक्रिया(legal process) लवकरात लवकर पूर्ण करून न्याय देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली आहे.