
Mumbai : मुंबई आणि गोरखपूर दरम्यान 12 आणखी साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या

सेंट्रल रेल्वेततून सुरू होणाऱ्या एकूण 638 उन्हाळी विशेष ट्रेन
मुंबई: (mumbai) सेंट्रल रेल्वेने आधीच 626 सेंट्रल रेल्वेतून सुरू होणाऱ्या उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे आणि आता उन्हाळ्यातील हंगामात(summer trains) प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस आणि गोरखपूर दरम्यान विशेष शुल्कासह 12 आणखी अतिजलद साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
ए) 02103/02104 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर साप्ताहिक अतिजलद विशेष (6 फेऱ्या)
02103 अतिजलद साप्ताहिक विशेष दि. 16 मे 2022 पासून दि. 30 मे 2022 (3 फेऱ्या) दर सोमवारी 5:15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी 17:15 वाजता पोहोचेल.
02104 अतिजलद साप्ताहिक विशेष दि. 18 मे 2022 पासून दि. 1 जून 2022 (3 फेऱ्या) पर्यंत प्रत्येक बुधवारी 03:00 वाजता गोरखपूर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 13:15 वाजता पोहोचेल.
संरचना: 14 द्वितीय आसन श्रेणी, गार्ड ब्रेक व्हॅनसह 5 सामान्य द्वितीय श्रेणी.
बी) 02105/02106 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर साप्ताहिक अतिजलद विशेष (6 फेऱ्या)
02105 अतिजलद साप्ताहिक विशेष दि.18 मे 1011 पासून दि.1 जून 2021 (३ फेऱ्या) पर्यंत प्रत्येक बुधवारी 05:15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी 17:15 वाजता पोहोचेल.
02106 अतिजलद साप्ताहिक विशेष दि. 20 मे 2022 पासून दि. 3 जून 2022 (३ फेऱ्या) दर शुक्रवारी 03:00 वाजता गोरखपूर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 13:15 वाजता पोहोचेल.
दोन्ही विशेष गाड्यांना थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती स्टेशन, बिना, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन, ओराई, गोविंदपुरी, फतेहपूर, प्रयागराज, ज्ञानपूर, बनारस, वाराणसी, औनीहार, मऊ, बेलथारा रोड, भटनी जंक्शन, देवरीया सदर.
संरचना: सहा तृतीय वातानुकूलित , 9 द्वितीय आसन श्रेणी, गार्ड ब्रेक व्हॅनसह 4 सामान्य द्वितीय श्रेणी.
आरक्षण: 02103 आणि 02105 विशेष ट्रेनसाठी बुकिंग विशेष शुल्कासह सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर दि. 13 मे 2022 रोजी सुरू होईल. वरील गाड्यांचे सामान्य द्वितीय श्रेणी डब्बे अनारक्षित डब्बे म्हणून चालतील.
तपशीलवार वेळ आणि थांबण्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करावे.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थान दरम्यान कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करण्याची विनंती केली जात आहे.