spot_img
HomeUncategorizedMizoram : दगडाच्या खाणीत 8 मजुरांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

Mizoram : दगडाच्या खाणीत 8 मजुरांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

Mizoram: 8 laborers die in stone quarry; Rescue operation started

Indiagroundreport वार्ताहर
ऐज़ौल : (Aizaul)
मिझोरममधील नाथियल जिल्ह्यातील मौदार(Maudar) येथे दगडाच्या खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. खाणीमध्ये मजूर काम करीत असताना त्यांच्यावर दगड कोसळले. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित ४ मजुरांचा शोध सुरू आहे. मजुरांचा शोध घेण्यासाठी बचावपथक, स्थानिक लोक, बीएसएफ, आसाम रायफल यांना पाचारण करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिझोरममधील(Mizoram) मौदार येथे एका खासगी कंपनीत मजूर काम करीत होते. दुपारचे जेवण करून ते नुकतेच कामावर परतले होते. मात्र, यावेळी अचानकपणे दगडाची खाण कोसळल्यामुळे जवळपास १२ मजूर दगडांखाली दबले गेले. सोबतच उत्खननासाठी लागणारी यंत्रेदेखील दगडाखाली दबली गेली. या घटनेची माहिती होताच शेजारील गावातील ग्रामस्थ, तसेच काही स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दगडांखाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, सीमा सुरक्षा दल, तसेच आसाम रायफल्सच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले.

या सर्व पथकांकडून(teams) बचावकार्य केले जात असून, आतापर्यंत ८ मृतदेह सापडले आहेत. दगडांखाली आणखी ४ कामगार दबल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यांचा शोध सुरू आहे. दगडाच्या खाणीत दबलेले सर्व स्थलांतरित मजूर आहेत.

दरम्यान, शवविच्छेदनानंतर बाहेर काढलेल्या मृतदेहांच्या नातेवाईकांचा शोध घेतला जाईल. अजूनही शोधकार्य सुरूच आहे. दगडाखाली दबलेले सर्व मजूर सापडेपर्यंत ही मोहीम सुरूच राहील, असे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने(The National Disaster Response Force) सांगितले आहे.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर