
Kalyan : कल्याण-डोंबिवलीत चोरांचा सुळसुळाट

Indiagroundreport वार्ताहर:
डोंबिवली (Maharashtra News) [India]: (Dombivali) कल्याण-डोंबिवलीत(Kalyan-Dombivali) चोऱ्या-घरफोड्यांसह धूम स्टाईलने चोऱ्या करणाऱ्यांचा प्रचंड प्रमाणात सुळसुळाट वाढला आहे. सोमवारी दिवसभर उच्छाद मांडणाऱ्या चोरट्यांनी 5 पादचारी महिलांना लक्ष करीत 1 कोटी 82 लाखांचा ऐवज हिसकावून पळ काढला आहे.
कल्याण पश्चिमेत चिकणघरमधील रिजेंसी क्रिस्टमधील राहणारी प्रतिभा अरूण तिवारी (41) ही महिला सकाळी 6.55 ते 7 च्या दरम्यान त्यांच्या राहत्या घराजवळील, रामबाग लेन नं. 4 कल्याण (पश्चिम) येथे रिक्षा स्टॅन्डकडे(rickshaw stand) जाण्यासाठी निघाले. सत्यम मेडिकलसमोर अनोळखी इसमाने मोटार सायकलवरुन येऊन त्यांना धक्का मारुन त्यांच्या गळयातील 17 ग्रॅम वजनाचे 51 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरीचे चोरुन नेली आहे. तसेच त्यांच्या ओळखीच्या शिक्षिका कुमुदिनी चौधरी या देखील त्याचदिवशी सकाळी 6:30 ते 6:45 दरम्यान काळातलावजवळील सार्वजनिक रोडवर मॉर्निग वॉक करीत असताना अनोळखी इसमाने मोटार सायकलवरुन येऊन जोरात हाताने त्यांच्या मानेवर मारुन त्यांच्या गळयातील 7 ग्रॅम वजनाची 21 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणीमंगळसूत्र जबरीने खेचून चोरी करून पळ काढला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिकणघर परिसरातील मुरलीधर अपार्टमेंटमध्ये राहणारी निर्मला रामनारायण पाल (48) ही महिला सोमवारी सकाळी 6:30 ते 6:45 दरम्यान पंजाब नॅशनल बँक, रजिस्ट्रेशन कार्यालय रोडने कल्याण (पश्चिम) येथून वॉकिंग करीत जात होती. अनोळखी चोरट्याने मोटार सायकलवर जोरात येऊन त्यांच्या मानेवर जोरात थाप मारुन त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने खेचली. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यास सोन्याची चैन हातात धरुन विरोध केला असता त्यांच्या गळयातील वरील वर्णनाची व किंमतीची सोन्याची चैन जबरीने खेचून अर्धी चैन जबरदस्तीने तोडून घेऊन पळून गेला आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात(Mahatma Phule Chowk police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामबाग मेन रोडला असलेल्या उगले चाळीत राहणारी सिमरन संजय धनावडे (23) या महिला सोमवारी सकाळी 6:50 च्या सुमारास आदर्श हिंदी हायस्कूल गेटसमोर, संतोषीमाता रोडने कल्याण (पश्चिम) येथून योगा क्लासकरिता पायी जात होत्या. अनोळखी चोरटयाने त्याच्या काळे रंगाच्या पल्सरसारख्या मोटार सायकलवरून जोरात त्यांच्या पाठीमागून येऊन त्यांना धक्का देऊन सिमरन यांच्या उजवे हातातील वरील वर्णनाचा मोबाईल फोन हा जबरीने खेचून चोरी करून पळून गेला.
याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटकोपर येथे राहणारी दीपाली दीपक जाधव (45) या सोमवारी सकाळी 5:55 च्या सुमारास त्यांचे पती व चुलत दिरासोबत घाटकोपर येथे जाण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्टेशनकडे पायी चालत जात होत्या. पाठीमागून एक अनोळखी इसम काळ्या रंगाची मोटारसायकलवरून आला. अंगात काळे रंगाचा हुडी असलेला जॅकेट व काळी पॅन्ट(black hoodie jacket and black pants) आणि मास्क घातलेला. अशा वर्णनाचा इसम पाठीमागून येऊन अचानक गळ्यावर थाप मारून दीपाली यांच्या गळ्यातील 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने खेचून घेऊन फडके रोडच्या दिशेने पळून गेला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.