
kalyan: केडीएमसी मधील अंतिम प्रभाग रचनेची यादी प्रसिध्द

कल्याण। (kalyan) कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 करीता अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना ही शासन राजपत्रामध्ये दिनांक 13 मे, 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण 44 प्रभाग संख्या करण्यात आली असून 997 हरकती पैकी 375 प्रशासनाने मान्य केल्याची माहिती निवडणूक उपायुक्त सुधारक जगताप यांनी दिली आहे।
कल्याण डोबिवली महापालिकेच्या निवडणूकीसाठी सन 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 15,18,762 असून लोकसंख्येच्या निकषानुसार निवडुन द्यावयाच्या पालिका सदस्यांची संख्या 133 इतकी आहे. सदरची निवडणूक ही बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार होणार आहे. एकुण प्रभागांची संख्या 44 असून तीन सदस्यांचे 43 प्रभाग व चार सदस्यांचा एक प्रभाग आहे (प्रभाग क्र. 44) असणार आहे . त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1,50,179 व अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42,584 इतकी आहे.अनुसूचित जातीसाठी एकूण 13 जागा राखीव राहणार असून त्यापैकी 7 जागा स्त्रियांसाठी राखीव असणार आहेत.अनुसूचित जमातीसाठी 4 जागा राखीव राहणार असून त्यापैकी 2 जागा स्त्रियांसाठी राखीव असणार आहेत.त्याच प्रमाणे सर्वसाधारण स्त्रीयांसाठी 58 जागा राखीव राहणार आहेत. उर्वरित 58 जागा या सर्वसाधारण असणार आहेत.
प्रभाग क्रमांक 28,29,32,37,38,42,43, यांच्या सीमा मध्ये बद्दल करण्यात आले आहे। अंतिम प्रभाग रचना ही सर्व प्रभाग कार्यालयाच्या सूचना फलकावर, महापालिका मुख्यालय व kdmcelection.com या संकेतस्थळावर आज 13 मे 2022 रोजी नागरिकांच्या पाहण्यासाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. उपआयुक्त (निवडणूक) सुधाकर जगताप यांनी माहिती दिली आहे.