
Kalyan: कल्याणात बुध्दभूमी फाऊंडेशन व्दारे बुध्द पौर्णिमा महोत्सव ; त्यात सर्व धर्मिय मैत्री संमेलन

सचिन सागरे
कल्याण: (Kalyan) बुद्ध भूमी हे ठाणे जिल्हयातील ऐतिहासिक नगरी कल्याण शहर येथे 29.5 एकर भूभागावर बुद्ध भूमी फाउंडेशन(Buddha Bhoomi Foundation), या संस्थेद्वारा विकसित केलेले बौद्धांचे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. येथे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Babasaheb Ambedkar) यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे नियमित आयोजन केले जाते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सामान्य नागरिक व बौद्ध उपासक-उपासिका सहभागी होतात.
येथील मुख्य आकर्षण म्हणजे म्यानमार देशातून आणण्यात आलेल्या एकाच संगमरवरी दगडात सुंदर कोरीव काम केलेल्या प्रस्थापित दोन भव्य बुद्धमूर्ती (Buddha forms) या आहेत. याशिवाय येथील महाविहाराच्या सभोवार अनेक छटातील लहान व मोहक बुद्धरूपे महाविहाराच्या सौंदर्यात भर टाकतात. बुद्ध भूमीच्या परीसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण हि करण्यात आले आहे.अशी पत्रकार परिषदेत माहिती देत १५ आणि १६ मे रोजी २५६६ वा बुध्द पौर्णिमा महोत्सव आयोजन करण्यात आल्याची भंदत गौतमरत्न महाथरो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
यावेळी रोहिणी जाधव, प्रताप माने, राजेंद्र बाविस्कर , प्रा. महेंद्र रहिवणे, डॉ राहुल शिरसाठ, नवीन गायकवाड , साक्षी डोळस, राहुल वाघ माधुरी सकपकाने, चंद्रमणी मेश्राम यांचे कार्यक्रमाचे आयोजनसाठी सहकार्य होत आहे. बुद्ध भूमी येथे नियमितपणे बुद्ध पौर्णिमा, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व महापरिनिर्वाण दिन तसेच देशातील अनेक महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ठाणे जिल्ह्यातील विविध बौद्ध संघटना व बुद्ध विहार समित्या तसेच विविध सामाजिक शैक्षणिक संस्था या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.