
Entertainment : ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत स्वप्निल जोशीचा पंजाबी लूक

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत स्वप्निल जोशीचा पंजाबी लूकमध्ये दिसणार आहे. ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतील पट्या आणि अनामिकाची अव्यक्त प्रेम कहाणी हळुवार फुलताना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेतील सौरभ म्हणजेच स्वप्निल जोशी(Swapnil Joshi) आणि अनामिक म्हणजेच शिल्पा तुळसकर यांच्या व्यक्तिरेखा आणि त्यांची जोडीदेखील प्रेक्षकांना आवडत आहे.

आता या मालिकेत प्रेक्षक पाहू शकतील की, सौरभच्या घरी जे पाच लाख आलेले आहेत त्यातून वल्ली दागिन्यांची खरेदी करते. ते दागिने खोटे आहेत हे अनामिका सांगते. आता ते पाच लाख परत आणण्यासाठी सौरभ मधला पट्या जागा होतो आणि सर्वसामान्य माणसांची फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकविलाच पाहिजे असे म्हणतो. त्या सोनाराच्या दुकानाबाहेर आपल्याला गर्दी दिसते. अनेकांची फसवणूक झालेली आहे, त्या फसवणूक करणाऱ्या माणसांना धडा शिकविण्यासाठी सौरभ पंजाबी माणसाचे रूप धारण करतो आणि त्या माणसांना शोधून चांगला चोप देतो. सौरभच्या या पंजाबी लूकमुळे प्रेक्षकांची हा भाग बघण्याची उत्सुकता खूप वाढली आहे. स्वप्निलने या पंजाबी लुकमधील फोटोज सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहे. चाहत्यांचा या फोटोला आणि स्वप्निलच्या या पंजाबी लुकला(Punjabi look) तुफान प्रतिसाद मिळत आहे.