
Dombivali : त्या पोलिसाचा आवाज ‘व्हॉइस ऑफ ठाणे’ स्पर्धेत

Indiagroundreport वार्ताहर
डोंबिवली : डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी राहुल मांडगे(Rahul Mandge) यांची ‘व्हॉइस ऑफ ठाणे` स्पर्धेत निवड झाली आहे. नुकतेच ठाकुर्ली येथील हॅप्पी स्ट्रीटमध्ये राहुल मांडगे यांनी सादर केलेले गाणे ऐकूण कल्याण परिमंडळ-३ चे उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी त्यांचे कौतुक केले होते. एवढेच नव्हे, तर उपस्थित नागरिकांनीही राहुल मांडगे यांच्या गाण्यावर डान्सही केला होता. राहुल मांडगे यांना मिळालेली ही कौतुकाची थाप थेट स्पर्धेत उपयोगी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पोलिसाला अनेकांनी पसंती दर्शविली
आता या पोलिसाचा सुरेख आवाज ठाणे(Thane) येथील ‘व्हॉइस ऑफ ठाणे’ स्पर्धेत ऐकण्यास मिळणार आहे. अनेक चित्रपटात आपल्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करून महाराष्ट्रातील अनेक पोलिसांनी आपली कला सादर केली. यूट्युब आणि फेसबूक सारख्या मध्यामातून या पोलिसाला अनेकांनी पसंती दर्शविली आहे. २१ स्पर्धकांमध्ये या पोलिसाची निवड झाली असून, २६ जून रोजी ठाणे येथील बौद्ध समाज उन्नती मंडळ समाज सभागृहात होणाऱ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत हा पोलीस विजयी ठरेल, अशी अपेक्षा पोलीस खात्याकडूनच नव्हे, तर डोंबिवलीकरही व्यक्त करीत आहेत.
काम करता करता जोपासली आपली कला
राहुल मांडगे यांचे तीन मोठे ऑपरेशन झाले आहेत. अश्या कठीण प्रसंगातून राहुल मांडगे बाहेर पडले. आपण दुसऱ्यासाठी जगावे असा विचार करून राहुल मांडगे यांनी आपली गाण्याची कला जोपासली. सुरुवातील काही पोलिसांसमोर आपल्या सुरेख आवजाने गीत सादर केल्यावर त्यांना मिळालेल्या टाळ्यांची साथ पुढे कायम राहिली. स्टेज शो करताना हे पोलीस(the police) आहे यावर सामान्य नागरिकांचा विश्वास बसत नव्हता. मात्र काम करता करता आपली कला जोपासल्याबद्दल वरिष्ठांकडून नेहमीच त्यांना प्रोत्साहन मिळाले, असे राहुल मांडगे म्हणतात. स्व.रमेश देव यांचे ‘सूर तेच छेडिता. गीत उमटले नवे’, ‘और इस दिल में क्या रखा है’ अशी दोन गाणी आवडत असल्याचे राहुल मांडगे यांनी सांगितले.