
Dombivali: कल्याण डोंबिवलीत धर्मवीर मुक्काम पोस्टला नागरिकाचा उत्फुर्त प्रतिसाद

शिवसेनेतर्फे थिएटर बाहेर आनंद दिघेच्या प्रतीमेला दुग्धभिषेक
IndiaGroundReport:
डोंबिवली : (Dombivali) शिवसेनचे(Shiv Sena) नेते स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे(Dharmaveer Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारित आणि गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असणारा धर्मवीर मु.पो. ठाणे हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. शिवसैनिकांच्या मनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्याप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे यांच्याबद्दल अढळ स्थान आहे. याचीच प्रचिती कल्याण डोंबिवलीत पाहायला मिळाली आहे.
कल्याण पूर्वेतील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड(Mahesh Gaikwad) व शिवसेना पदाधिकार्यांच्या वतीने आज दुपारी साढ़े बारा वाजता कल्याण मेट्रो मॉल बाहेर ढोल ताशाच्या गजरात स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक घालत , पुष्वृष्टी केली या वेळी थिएटर मध्ये शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. तर चित्रपट सुरू झाल्यानंतर “आनंद दिघे अमर रहे” च्या घोषणांनी संपूर्ण चित्रपटगृह दणाणून सोडले पाहायला मिळाले आहे.