
Dhule: शेतकऱ्यांना ३२४ कोटींचे पीककर्ज वितरित

Indiagroundreport वार्ताहर
धुळे : (Dhule) खरिपात शेतकऱ्यांना बी-बियाणे(seeds), रासायनिक खते वेळेत खरेदी करता यावेत यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज वितरण सुरू आहे. आत्तापर्यंत ३० हजारावर शेतकऱ्यांना ३२४ कोटी ८३ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अभिजीत देशपांडे यांनी दिली.
धुळे जिल्ह्यास ७१३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट
धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) व जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात १ एप्रिल २०२२ पासून पीककर्ज वितरणास सुरुवात झाली. धुळे व नंदुरबार (Nandurbar) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, एमएससी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीककर्जाचे(Crop Loan) वितरण करण्यात येते. खरीप पीककर्ज वितरणासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी धुळे जिल्ह्यास ७१३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आत्तापर्यंत ३० हजार ७१६ शेतकऱ्यांना ३२४ कोटी ८३ लाख चार हजार रुपये पीककर्ज वितरित करण्यात आले आहे.